कुंभमेळ्यासाठी मानधनावर भरतीची मागणी
By Admin | Updated: June 3, 2014 02:19 IST2014-06-03T02:06:29+5:302014-06-03T02:19:03+5:30
नाशिक : कुंभमेळ्यासाठी मानधनावर सफाई कामगारांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यासाठी मानधनावर भरतीची मागणी
नाशिक : कुंभमेळ्यासाठी मानधनावर सफाई कामगारांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सफाई कामगारांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे अशी कामे करण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने काम न करता मानधनावर कामगारांची भरती करावी, स्थानिक बाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाजातील किमान ५०० युवकांना सेवेत संधी द्यावी, अशी मागणी संघाचे महासचिव अनिल बहोत, सोनू कागडा, सतीश टाक, श्याम लोट, राहुल पटोले, सागर कल्याणी, सचिन बिडलॉन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे.