दीड हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जेरबंद ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

By Admin | Updated: May 13, 2014 23:56 IST2014-05-13T21:50:16+5:302014-05-13T23:56:07+5:30

अहमदनगर : जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी रुईछत्तीसी मंडळाचा मंडल अधिकारी अविनाश मनोहर दाभाडे याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दाभाडे याला अटक करण्यात आली आहे. नाशिक विभागाने दोन पोलिसांना लाच घेताना पकडल्यानंतर २४ तासांच्या आतच ही दुसरी घटना घडली आहे.

Mandal Officer Zerabandhu Kadam accepting a bribe of one and a half thousand | दीड हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जेरबंद ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

दीड हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जेरबंद ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

अहमदनगर : जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी रुईछत्तीसी मंडळाचा मंडल अधिकारी अविनाश मनोहर दाभाडे याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दाभाडे याला अटक करण्यात आली आहे. नाशिक विभागाने दोन पोलिसांना लाच घेताना पकडल्यानंतर २४ तासांच्या आतच ही दुसरी घटना घडली आहे.
तक्रारदारांच्या आईच्या नावे सन २००१ मध्ये मठ पिंपरी (ता.नगर) येथील एक एकर चार आर या खरेदी केलेल्या जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी दाभाडे याने तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये मागितले. ही लाच दाभाडे याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता नगरच्या तहसील कार्यालयात स्वीकारली. दरम्यान दाभाडे यांच्या रेल्वेस्टेशन रोडवरील आगरकर मळ्यामधील घराचीही झडती घेण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीही सापडले नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Mandal Officer Zerabandhu Kadam accepting a bribe of one and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.