नाशिकरोड : प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद का नाही केला अशी विचारणा केल्याचा राग आल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.नाशिकरोड येथील मनपा स्वच्छता निरीक्षक प्रभाकर देवराम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी पावणेसात वाजता जेलरोड कॅनॉलरोड येथील बाळासाहेब शेलार यांच्या म्हशीच्या गोठ्यात जाऊन त्यांना प्लॅस्टिक पिशव्या वापर बंद करण्याबाबत आदेश असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्या बंद का केल्या नाहीत अशी विचारणा केली. याचा राग आल्याने शेलार यांनी मी नाही बंद करणार, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत थोरात यांना शिवीगाळ करून मारहाण करत दमदाटी केली. सदर प्रकार थोरात यांनी स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांना फोन करून सांगितला. गोसावी हे शेलार यांना समजविण्यास गेले असता त्यांनादेखील शिवीगाळ केली. याप्रकरणी अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा स्वच्छता निरीक्षकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:06 IST
नाशिकरोड : प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद का नाही केला अशी विचारणा केल्याचा राग आल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मनपा स्वच्छता निरीक्षकास मारहाण
ठळक मुद्देमनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाणयाप्रकरणी अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल