माणिकपुंज येथील तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:43 IST2019-07-23T17:43:15+5:302019-07-23T17:43:27+5:30

नांदगाव : तालुक्यातील माणिकपुंज येथील रफिक लतिफ शेख (२७) हा तरु ण शेतात मका पिकाला पाणी देण्यास गेला असता दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचे उघड झाले.

Man murdered at Manikpurj | माणिकपुंज येथील तरुणाचा खून

माणिकपुंज येथील तरुणाचा खून

नांदगाव : तालुक्यातील माणिकपुंज येथील रफिक लतिफ शेख (२७) हा तरु ण शेतात मका पिकाला पाणी देण्यास गेला असता दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख हा सोमवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता माणिकपुंज शिवारातील शेतावर मका पिकाला पाणी देण्यास गेला होता. रात्री ९ वाजले तरी तो घरी आलाच नाही, म्हणून त्याचा शोध घेतला असता दुसºया दिवशी मंगळवारी (दि.२३) सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह माणिकपुंज गावाच्या बाजूला टाकळी रोडवरील एका मोरीजवळ आढळून आला. या दरम्यान सदर मयतास कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला व डाव्या हाताला धारदार हत्याराने घाव घालून जिवे ठार मारून रोडच्या कडेला टाकून दिले होते. दरम्यान, या घटनेची माहिती संपूर्ण तालुक्यात पसरल्यामुळे शेकडो लोक ग्रामीण रुग्णालयाकडे जमले होते.

Web Title: Man murdered at Manikpurj