मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव

By Admin | Updated: May 20, 2014 00:38 IST2014-05-19T23:51:08+5:302014-05-20T00:38:03+5:30

नाशिक : मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव दि. २२ ते २९ मे या कालावधीत आडगाव नाका येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा केला जाणार असून, महोत्सवात मान्यवरांची कीर्तने व प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.

Mamaasaheb Dandekar Smruti Saurabh Mahotsav | मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव

मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव

नाशिक : मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव दि. २२ ते २९ मे या कालावधीत आडगाव नाका येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा केला जाणार असून, महोत्सवात मान्यवरांची कीर्तने व प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.
दि. २२ ते २५ मे या कालावधीत सायंकाळी ५.३० वाजता आळंदीचे चक्रांकित महाराज यांचे प्रवचन व रात्री ८ वाजता दि. २२ रोजी माधवदास राठी, दि. २३ रोजी संदिपान महाराज हांसेगावकर, दि. २४ रोजी संजय महाराज पांचपोर, दि. २५ रोजी प्रमोद महाराज जगताप यांची कीर्तने होणार आहेत. दि. २६ व २७ मे रोजी पंढरपूरचे चैतन्य महाराज देगलूरकर यांचे सायंकाळी ५.३० वाजता प्रवचन, तर दि. २६ रोजी रात्री ८ वाजता जयवंत महाराज बोधले आणि शरदश्चंद्र महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. दि. २९ मे रोजी सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार असून, दुपारी महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त किसनलाल सारडा यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

Web Title: Mamaasaheb Dandekar Smruti Saurabh Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.