लोहोणेर येथे कुपोषित बालिका आढळली
By Admin | Updated: April 7, 2016 23:56 IST2016-04-07T22:37:14+5:302016-04-07T23:56:22+5:30
लोहोणेर येथे कुपोषित बालिका आढळली

लोहोणेर येथे कुपोषित बालिका आढळली
लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथे आजोबांकडे आलेली दोन वर्षाची नात कुपोषित असल्याचे आढळून आले असून, तिला
लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी
डॉ. योगेश पवार यांनी प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर मात्र संबंधित
यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.
बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील शेतमजूर प्रकाश वाघ यांची दोन वर्षाची मुलगी खुशी
ही देवळा तालुक्यातील खालप
येथे आपले आजोबा कृष्णा चिंधा पवार यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून पाहुणी म्हणून आली असून, तिची प्रकृती खालावत चालली होती. या प्रकरणी अंगणवाडी कार्यकर्ती गंगूबाई बापू सूर्यवंशी यांना येथील युवा कार्यकर्ते संदीप महाजन यांनी कल्पना दिली. मात्र त्यांनी या प्रकरणी दुर्लक्ष केले असता संदीप महाजन यांनी पुढाकार घेऊन सदर बालिकेला लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले.
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी सदर बालिकेची तपासणी केली असता तिची प्रकृती ३ एचडीच्या टप्प्यावर गेली असल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. (वार्ताहर)