माळीवाडा ग्रामपंचायतीत पावणेअकरा लाखांचा अपहार

By Admin | Updated: May 6, 2017 23:25 IST2017-05-06T23:25:00+5:302017-05-06T23:25:14+5:30

सटाणा : ग्रामनिधी व पेसा निधीच्या खात्यामधून ग्रामसेवक व सरपंचाने संगनमत करून पावणेअकरा लाखचा अपहार केल्याचा प्रकार तालुक्यातील माळीवाडा येथे उघडकीस आला.

Maliwada gram panchayat to get rid of half a million | माळीवाडा ग्रामपंचायतीत पावणेअकरा लाखांचा अपहार

माळीवाडा ग्रामपंचायतीत पावणेअकरा लाखांचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : तेरावा वित्त आयोग, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामनिधी व पेसा निधीच्या खात्यामधून ग्रामसेवक व सरपंचाने संगनमत करून पावणेअकरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा खळबळजनक प्रकार बागलाण तालुक्यातील माळीवाडा येथे उघडकीस आला. याप्रकरणी ग्रामसेवक व महिला सरपंच यांच्या विरुद्ध जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळीवाडा ग्रामपंचायतीचे जिल्हा बँकेच्या मुल्हेर शाखेत खाते आहे. पेसा निधी, १३वा वित्त आयोग, ग्रामनिधी, ग्रामीण पाणीपुरवठा निधी अशी चार खाती उघडण्यात आली आहेत. ग्रामसेवक व सरपंच असे दोघांचे संयुक्त खाते आहे. माळीवाडा येथील ग्रामसेवक एकनाथ भोये, सरपंच पुष्पाबाई रतन गवळी या दोघांनी संगनमत करून २७ मे २०१५ ते ४ मार्च २०१६ या कालावधीत शिपाई पगार, पाणीपुवठा करणे तसेच तेरावा वित्त आयोगाअंतर्गत कामे दाखवून तब्बल पावणेअकरा लाख रुपये खर्ची पडल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: Maliwada gram panchayat to get rid of half a million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.