मल्हार हिलचा विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:14+5:302021-08-15T04:17:14+5:30
भाक्षी (ता. बागलाण) येथील मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तयार केलेल्या नावीन्यपूर्ण नवोपक्रमाच्या ...

मल्हार हिलचा विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम
भाक्षी (ता. बागलाण) येथील मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तयार केलेल्या नावीन्यपूर्ण नवोपक्रमाच्या अनावरणप्रसंगी चित्रा देवरे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. पगार, बी. जे. पगार, केंद्र प्रमुख हिरालाल बाधान यांनीही नवोपक्रमाचे कौतुक केले तसेच विद्यालयास शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी प्रास्ताविकातून नवोपक्रमाचे स्वरूप समजून दिले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, सुरेश येवला, किरण सोनवणे, शेखर अहिरे, ज्ञानेश्वर सोळुंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, विशाखा सोनवणे, हर्षाली मोरे, पवन नाडेकर, सुजाता पाटील यांचे सहकार्य लाभले. शेखर आहिरे यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळ दात्रे यांनी आभार मानले. (१४ सटाणा २)
140821\14nsk_21_14082021_13.jpg
१४ सटाणा २