Malegavi yarn warehouse khak | मालेगावी सूत गुदाम खाक

मालेगाव येथे चाळीसगाव फाट्याजवळील सूत गुदामाला लागलेली आग.

मालेगाव : येथे सुताच्या गुदामाला लागलेल्या आगीम गुदाम जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. अग्निशमन दलाच्या जनावांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
चाळीसगाव फाटा येथील लोणवाडे शिवारात जीवनराम रामुराम लेगा यांच्या मालकीचे सुताचे गुदाम आहे. शुक्रवारी सायंकाळी १० चाकी ट्रकमधील माल उतरवून हमाल गुदामाबाहेर पडले होते. यानंतर काही क्षणातच गुदामाला आग लागली. आग इतकी भयंकर होती की गुदामाचे पत्रे व लोखंडी अँगलही वितळू लागले होते. धुराचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे समोरील आणखी एका गुदामालाही आग लागली. मात्र, नागरिकांनी गुदामाची भिंत जेसीबीच्या सहाय्याने तोडत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. घटनास्थळी निरीक्षक नरेंद्र भदाणे, सहायक उपनिरीक्षक पाटील व सहकाऱ्यांनी गर्दी नियंत्रणात आणली.


याप्रकरणी अग्निशमन दल विभागात आकस्मिक जळीताची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Malegavi yarn warehouse khak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.