मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:28 IST2019-07-13T01:26:59+5:302019-07-13T01:28:01+5:30

मालेगाव शहरातील अख्तराबाद येथे नवविवाहित तरुणाने राहत्या घरात शुक्रवारी १२ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Malegaon's newly-married youth commits suicide | मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या

मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या

मालेगाव मध्य : शहरातील अख्तराबाद येथे नवविवाहित तरुणाने राहत्या घरात शुक्रवारी १२ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अख्तराबाद येथील शेख अबरार शेख करीम (२७) या तरुणाने राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत अबरार शेख याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेले होते. त्याचे वडील करीम शेख हे त्याच्या पत्नीला घेण्यासाठी जळगाव येथे गेले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अबरारच्या आईचे पूर्वीच निधन झालेले असून, वडील, लहान भाऊ व पत्नीसह तो येथे राहत होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



पोलीस हवालदार सुलतान शेख करीत आहेत.

Web Title: Malegaon's newly-married youth commits suicide