मालेगाव : सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी असून कामावर शंभर टक्के उपस्थिती आहे; मात्र मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत असल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.
मालेगावचे तहसीलदार राजपूत सकाळी १० वाजेपासूनच कार्यालयात हजर होते; तर इतर कर्मचारीही वेळेत उपस्थित राहून ग्रामपंचायत निवडणुकीचे काम करीत असल्याचे दिसून आले. एकूण ३३ पदांपैकी केवळ १४ कर्मचाऱ्यांना कामाचा गाडा ओढावा लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिरिक्त दोन पदांचा भार आहे. मालेगाव तहसील कचेरीत संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदाराचे पद आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी अशी दोन पदे रिक्त असल्याने तहसीलदारांना एकाचवेळी तीन जणांचा पदभार सहन करावा लागत आहे. मालेगाव तहसील कचेरीत नायब तहसीलदार, १ प्रशिक्षणार्थी तहसीलदार, १० अव्वल कारकून, २० लिपीक आणि ७३ तलाठी अशी पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात तीन तहसीलदारांचे काम एकाच तहसीलदाराला करावे लागत आहे तर नायब तहसीलदारांची ५ पदे असताना त्यातील ३ पदे रिक्त असून २ नायब तहसीलदारांवरच काम भागवावे लागत आहे. त्यात एक प्रशिक्षणार्थी तहसीलदार आहे. अव्वल कारकुनाची १० पदे मंजूर असताना २ सेवावर्ग झाले तर आज केवळ ६ अव्वल कारकून कामावर होते. लिपिकाची २० पदे असून त्यात केवळ ६ लिपीक कामावर होते; त्यातील लिपिकांची ८ पदे रिक्त असून १ सेवावर्ग आणि २ गैरहजर आहेत.
मालेगाव तालुक्यासाठी तलाठ्याची ७३ पदे मंजूर असताना केवळ ३७ तलाठ्यांवर भागवावे लागत आहे. त्यामुळे तलाठ्यांवर कामाचा भार पडत असून तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यात मार्चमध्ये एक नायब तहसीलदार सेवानिवृत्त होणार आहे. पुरवठा विभागात ४ जणांपैकी ३ कर्मचारी हजर होते तर एक जण नाशिक येथे कार्यालयीन कामासाठी गेला आहे. करमणूक कर विभागाला केवळ बोडके नामक एकमेव अव्वल कारकून असून एकाच अधिकाऱ्याला करमणूक कर विभाग सांभाळावा लागत आहे.
जमावबंदी विभागात ३ जण असून त्यात १ लिपीक, २ कारकून आणि एक अव्वल कारकून आहेत. त्यात एक लिपीक रजेवर होता. कूळ कायदा विभागात एकट्या विसपुते नामक अव्वल कारकुनाला काम करावे लागत आहे. ट्रेझरी अव्वल कारकुनाचे पद रिक्त असून २ लिपीक कामावर हजर होते.
===Photopath===
281220\28nsk_15_28122020_13.jpg
===Caption===
मालेगाव तहसील कचेरीत सुरू असलेले कामकाज.