मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 01:25 IST2021-10-16T01:24:38+5:302021-10-16T01:25:01+5:30

मालेगाव येथील साठ फुटी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात व रामसेतूवरील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन करण्यात आले.

Malegaon Rashtriya Swayamsevak Sangh's Shastra Pujan | मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन

मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन

मालेगाव : येथील साठ फुटी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात व रामसेतूवरील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी संचलन करत असते. यंदा मात्र कोरोनाचे नियम पाळता शस्त्रपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गंगाधर पगार हे उपस्थित होते. यावेळी संघ म्हणजे समाज आणि समाज म्हणजे संघ. समरसतेच्या मार्गाने देशाला परमवैभवाला नेणे हे संघाचे ध्येय आहे. एक तासाच्या संघ शाखेत जाऊन राष्ट्रभक्तीचे धडे गिरवणे व आपल्या सार्थक जीवनाचा फायदा समाजाला होणे हे संघाला अपेक्षित असल्याचे पगार यांनी सांगितले. शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात शेकडो स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. यावेळी घोष पथकाद्वारे स्थिर वादन करण्यात आले.

Web Title: Malegaon Rashtriya Swayamsevak Sangh's Shastra Pujan