मालेगावी पोलिसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:45 IST2018-11-22T22:45:38+5:302018-11-22T22:45:54+5:30
मालेगाव : शहरातील इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.

मालेगावी पोलिसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त
मालेगाव : शहरातील इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठाकूरवाड यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. नजीर अहमद अब्दुल
हमीद रा. अन्साररोड याने अवैधरीत्या विनापरवाना घरगुती गॅस
सिलिंडर स्वत:च्या फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता साठवून ठेवलेले मिळवून आले.
अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण तसेच कर्मचारी अहिरे, पावरा, चव्हाण यांनी ही कारवाई केली. यात विविध कंपन्यांचे १२ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर किंमत २० हजार ४०० रुपये मिळून आले.
साठवणुकीबाबत गॅस सिलिंडरचा परवाना आरोपीकडे नसल्याचे आढळून आले. नजीर अहमद विरोधात गुन्हा दाखल झाला.