मालेगावी पोलिसांचा छापा; लाखोंचा गांजा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:34 IST2020-07-03T22:29:42+5:302020-07-04T00:34:41+5:30

मालेगाव येथील महामार्गावरील लबैक हॉटेल येथे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलिसांनी गांजाची वाहतूक करताना मोहंमद गुलजार मोहंमद कलीम ऊर्फ पापा यास अटक केली आहे. त्याच्याकडून ४ लाख ६९ हजार ५०० रुपये किमतीचा ४६ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यास ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Malegaon police raid; Millions of cannabis seized | मालेगावी पोलिसांचा छापा; लाखोंचा गांजा केला जप्त

मालेगावी पवारवाडी पोलिसांनी पकडलेला गांजा.

मालेगाव मध्य : येथील महामार्गावरील लबैक हॉटेल येथे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलिसांनी गांजाची वाहतूक करताना मोहंमद गुलजार मोहंमद कलीम ऊर्फ पापा यास अटक केली आहे. त्याच्याकडून ४ लाख ६९ हजार ५०० रुपये किमतीचा ४६ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यास ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
मोहंमद गुलजार मोहंमद कलीम ऊर्फ पापा हा धुळ्याकडून येत असताना दुचाकीवरुन (क्र. एमएच ४१ ५२८९) अतिक मुंबय्या, आमीन व आसिफ चुहा यांचा गांजा घेऊन येत होता. त्याच्याकडील प्लॅस्टिक गोण्यांची तपासणी केली असता त्यात ९ पाकिटात गांजा आढळून आला.
पोलीस नाईक सचिन थोरात यांनी पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा करीत आहे. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, सुरेश बावीस्कर, सय्यद पगारे, विनायक जगताप, अंबादास डामसे, नवनाथ शेलार, राकेश जाधव, दीपक हेबांडे, पोलीस नाईक इम्रान सय्यद, सचिन बेदाडे, सचिन थोरात, मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Malegaon police raid; Millions of cannabis seized

टॅग्स :Policeपोलिस