मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:25+5:302021-06-26T04:11:25+5:30
मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी ...

मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा
मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणे-घेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांनी केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली. यावेळी गिरणा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन विजय रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंत पवार, माजी संचालक अरुण देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, विजय पवार, राजेंद्र जाधव, विनोद शेलार, गुलाबराव चव्हाण, प्रकाश वाघ, अशोक पवार, रतन हलवर, सलीम रिझवी, प्रफुल्ल पवार, अरुण आहेर, प्रशांत पवार, बाळासाहेब वाणी, संदीप अहिरे, अशोक निकम, किशोर इंगळे, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
-----------------
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
केंद्रातील मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रतिलिटरला किमतीचे शतक पार केले असून डिझेलदेखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडे फार वाढले की, ‘बहुत हुई मेहंगाई की मार...’ अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव १०४ रुपये तर डिझेलचे भाव ९६ रुपये प्रतिलिटर झाले तरी शांत का, असा सवाल पगार यांनी यावेळी बोलताना केला. एकही भूल कमल का फूल; पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
---------------------
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगावी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चाप्रसंगी रवींद्र पगार, संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, विजय पवार, डॉ. जयंत पवार, अरुण देवरे, राजेंद्र जाधव आदी. (२५ मालेगाव ३)
===Photopath===
250621\25nsk_6_25062021_13.jpg
===Caption===
२५ मालेगाव ३