मालेगाव मनपाच्या व्हॉलमनचे पगार थकले
By Admin | Updated: January 12, 2016 22:26 IST2016-01-12T22:25:20+5:302016-01-12T22:26:25+5:30
मालेगाव मनपाच्या व्हॉलमनचे पगार थकले

मालेगाव मनपाच्या व्हॉलमनचे पगार थकले
मालेगाव : महानगरपालिकेच्या प्रभाग ३ व ४ पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्हॉलमनचे मागील चार महिन्यांचा थकीत पगार देण्याची मागणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मुजाहिद खलील बेग, इस्माईल शेख आदिंनी केली आहे.
निवेदनात या कामासाठी मनपातर्फे ठेका देण्यात आलेला आहे. सदर ठेकेदाराने १७ पाणी सोडणाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांचे वेतन थकविले आहे.
यामुळे या पाणी सोडणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.