शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

मालेगाव महापालिका त्रिशंकू

By admin | Published: May 27, 2017 1:19 AM

मालेगाव : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव :अखेरपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस २८, राष्ट्रवादी कॉँग्रेस २०, शिवसेना १३, भारतीय जनता पक्ष ९, एमआयएम ७, जनता दल ६ याप्रमाणे पक्षीय बलाबल असून, एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. पूर्व भागात कॉँग्रेसचे, तर पश्चिम भागात शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे. अनेक प्रभागांत धक्कादायक निकाल लागले असून, काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत मालेगावात प्रथमच भाजपा आणि एमआयएमने खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षासह एमआयएमने उमेदवार उभे केल्याने मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकी कोणता पक्ष बाजी मारतो याबाबत वेगवेगळे आडाखे मांडले जात होते. मतमोजणीनंतर सर्व आडाखे फोल ठरले असून, मालेगावकरांनी कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने कौल दिलेला नाही. शहरातील वेगवेगळ्या पाच केंद्रांवर मतमोजणी करण्यात आली होती. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रभागनिहाय प्रत्येकी तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. काही प्रभागांची मतमोजणी दोनच फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली. फेरीनिहाय मतमोजणी होत असली तरी अंतिम फेरीनंतरच विजयी उमेदवार घोषित करण्यात येत होते. साधाणत: साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यानंतर थोड्याच वेळात महापालिकेचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत कॉँग्रेस ६२, भाजपा ५६, राष्ट्रवादी कॉँग्रेस ५१, शिवसेना २६, जनता दल १०, एमआयएम ३५ या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह १९९ अपक्ष उमेदवारांनी आपले राजकीय भवितव्य आजमिवले. २१ प्रभागात ८४ जागांसाठी एकुण ३७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने परिसर दणानुन जात होता.निवडणुकीच्य निकालानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढुन जल्लोष साजरा केला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होउ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांबराबरच बाहेरगावहुन पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली होती. यात शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, विशेष भरारी पथके, दंगा नियंत्रण पथक आदींचा समावेश होता. जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक राकेश ओला हे स्वत: संपूर्ण पोलिस बंदोबस्तावर नजर ठेवुन होते. बहुतेक मतमोजणीकेंद्र शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने मतमोजणीदरम्यान प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गर्दीला पांगविण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. या निवडणुकीत पक्षीय उमेदवारांबरोबरच अनेक अपक्षांनीही आपले राजकीय भवितव्य आजमावले पणे केवळ एका अपक्षाला यश मिळाले. कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या जागा वाढल्या आहेत हे मालेगाव महानगर पालिका निवडणुकीचे वेगळे वैशिट्य ठरले आहे.

.विद्यमान महापौरांचा पराभवया निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला त्यात विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम , माजी महापौर अब्दुल मलिक शेख, माजी उपमहापौर रशीद येवलेवाले, कॉँग्रेसचे गटनेते हाजी खालीद शेख रशीद, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. संजय दुसाने, विद्यमान नगरसेवक मनीषा हिरे, विजया काळे, माजी नगरसेवक अनंत भोसले, रवींद्र पवार आदींचा समावेश आहे.

प्रमुख विजयी उमेदवारविजयी उमेदवारांमध्ये कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद, माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेवक सखाराम घोडके, भाजपा शहराध्यक्ष सुनील गायकवाड, मदन गायकवाड, निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद इकबाल, शान-ए-हिंद, विद्यमान उपमहापौर युनूस इसा यांचा समावेश आहे.