मालेगाव मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:14 IST2021-05-09T04:14:49+5:302021-05-09T04:14:49+5:30
महानगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शहर विकासाचा मुद्दा नजरेसमाेर ठेवला हाेता. ...

मालेगाव मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
महानगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शहर विकासाचा मुद्दा नजरेसमाेर ठेवला हाेता. वरिष्ठ नेत्यांनी विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाने टाकलेली जबाबदारी निश्चित पूर्ण करू. शहराचा विकास हेच एकमेव ध्येय आहे. शहरहिताची १५ कामे पक्ष वरिष्ठांसमाेर ठेवली हाेती. काेराेना महामारीतून सावरल्यानंतर या कामांसाठी पाठपुरावा करणार आहाेत. ही कामे पूर्ण करून शहर विकासाला चालना दिली जाईल. पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना साेबत घेऊन काम करणार आहाेत. जुने कार्यकर्ते सांभाळून नवीन कार्यकर्ते जाेडून पक्षाचे संघटन अधिक मजबूत केले जाईल. भविष्यात महापालिका निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी महापाैर राष्ट्रवादीचाच असेल यादृष्टीने तयारी करणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. या वेळी राष्ट्रवादीचे युवानेते राजेंद्र भाेसले, विनाेद शेलार, युसूफ नॅशनलवाले, नगरसेवक अतिक कमाल, ॲड. हिदायततुल्ला, महेमूद शाह, रफिक भुऱ्या, शकील जानी बेग, रियाज अली आदी उपस्थित हाेते.