मालेगाव महानगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:49+5:302021-04-12T04:12:49+5:30

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मोसम पूल चौक येथील महापालिकेद्वारे ...

Malegaon Municipal Corporation | मालेगाव महानगरपालिका

मालेगाव महानगरपालिका

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

मोसम पूल चौक येथील महापालिकेद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नवीनच सुशोभिकरण केलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारकाला महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस व रोहिदास दोरकुलकर यांनी संयुक्तरित्या पुष्पहार अर्पण केला. महापालिकेत आयुक्तांच्या संवाद कक्ष सभागृहात अपर जिल्हाधिकारी, मालेगाव तथा प्रभारी आयुक्त धनंजय निकम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे, प्र. नगरसचिव श्याम बुरकुल, प्र. संगणक विभागप्रमुख सचिन महाले, हरिश डिंबर, अभियंता जयपाल त्रिभुवन, प्र. उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, गजानन बन्नापुरे, सुनील खैरनार, बळवंत बाविस्कर, बाजीराव सोळंकी, उदय आहिर, आदी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Malegaon Municipal Corporation