दिल्लीतील शाहीन बागेतील सुरू असलेल्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल. दुसऱ्या छायाचित्रात मालेगावच्या महापौर ताहेरा रशीद शेख.मालेगाव मध्य : एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याच्या विरोधात नवीदिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात काल मंगळवारी मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी तर आज बुधवारी सायंकाळी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला. सायंकाळी दिल्लीच्या शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने तिनही कायद्याच्या विरोधात होणारे आंदोलन शहरापुरते मर्यादित न राहता दिल्लीस जावून पोहोचले आहे.नागरिकत्व सुधारणा कायदा २०१५, राष्टÑीय नागरिक नोंदणी व जनगणना असे तिनही कायदे एका पाठोपाठ केंद्र सरकारने लादल्याने प्रथम आसामातून सुरू झालेले आंदोलन संपूर्ण देशात व्यापले आहे. या कायद्याविरोधात मालेगाव शहरातून दस्तुर-ए-हिंद बचाव कमिटीच्या वतीने १९ डिसेंबर २०१९ रोजी पुरूषांचा व दस्तुर बचाव कमिटीच्या वतीने ६ जानेवारी रोजी शहरातून मोर्चे काढण्यात आले. दोन्ही मोर्चांमध्ये पुरूषांच्या बरोबरीने महिलाही सहभागी झाल्याने आंदोलनातील सहभागाचे आजवरचे विक्रम मोडीत निघाले. त्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांसह विविध धार्मिक, सामाजिक व विद्यार्थी संघटनांकडून रोज कॅण्डल मार्च, फेºया , धरणे अशा विविध प्रकारे आंदोलने केली जात आहेत.दिल्लीच्या शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सुन्नी कौन्सिलच्या नेतृत्वाखाली आजपासून जुना आग्रा रस्त्यावरील हुसेनशेठ कम्पाऊंड येथे महिलांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सदर आंदोलनास पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागातून महिलांनी हजेरी लावली. २६ जानेवारी रोजी शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणी राष्टÑध्वज घेत राष्टÑगीत म्हणून या कायद्यांचा निषेध करण्यात येणार आहे. मात्र मंगळवारी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, बुधवारी महापौर ताहेरा शेख रशीद, नगरसेविका कमरून्नीसा मोहंमद रिजवान, जैबुन्नीसा नुरूल्ला अन्सारी, फैमिदा फारूख कुरैशी, महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष आबीदा साबीर गौहर, शेख शबाना यांच्यासह महिला, लहान मुलांनीही शाहीनबागला भेट देवून सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच शाकीर शेख, आमीर मलीक, पास्बाने-ऐन-ए-हिंदचे अब्दूल कादीर, मोहंमद अल्मास यांनीही शाहीन बागला भेट दिली. यामुळे दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या आंदोलनाची शहरात चर्चा रंगत आहे.
मालेगावच्या महापौरांचे दिल्लीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:26 IST
एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याच्या विरोधात नवीदिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात काल मंगळवारी मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी तर आज बुधवारी सायंकाळी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला. सायंकाळी दिल्लीच्या शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने तिनही कायद्याच्या विरोधात होणारे आंदोलन शहरापुरते मर्यादित न राहता दिल्लीस जावून पोहोचले आहे.
मालेगावच्या महापौरांचे दिल्लीत धरणे
ठळक मुद्देएनआरसी-सीएएला विरोध : आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचेही आंदोलन