शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

मालेगाव महापौरांच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:32 IST

महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली.

ठळक मुद्देमहापौर निवडणूक : महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव मध्य : महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली. घटनेनंतर महागठबंधनच्या नगरसेविकांनी शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला.मनपाच्या महापौरपदी ताहेरा शेख यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या वतीने शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक खयबान-ए-निशात चौक, चंदनपुरी गेट मार्गे अमन चौकात आली असता महापौर ताहेरा शेख यांचे दिर जलील शेख, एहसान, हारुन बेग, अर्शद लईक अली व इतर १० ते १२ जणांनी नगरसेवक एजाज बेग यांच्या इस्लामनगर येथील निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले. यावेळी नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग या ‘तुम फटाके घर के अंदर क्यू फोड रहे हो, घर केबाहर जाओ’ असे सांगण्यास गेली असता संशयितांनी फिर्यादीस धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली, असे यास्मीनबानो यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेआहे.सदर घटनेची माहिती मिळताच महागठबंधनच्या गटनेत्या शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.यावेळी महिला नगरसेविकेस शिवीगाळ केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी धाव घेत नगरसेविकांची समजूत काढत निष्पक्ष कारवाईकरण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी परिसरात काही काळ तणाव पसरला होता. पोलिसांनी गांभीर्य परिस्थितीचे ओळखत बंदोबस्त तैनात केला.खबरदारीचा उपायमहागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक अहमद कमाल अहमद यांच्यासह नगरसेविका जकीयाबी नजीरूद्दीन व सायराबानो शाहीद अहमद या दोन नगरसेविकांनी आम्ही राष्टÑवादीत असल्याची भूमिका महापौर निवडणुकीपूर्वी घेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र ऐनवेळेस सभागृहात महागठबंधनच्या उमेदवार शान-ए-हिंद यांना मतदान केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवक अतिक कमाल यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी