शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव, लोणी, चाळीसगावच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना 'मोक्का'; १६ गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा दणका

By अझहर शेख | Updated: April 16, 2024 18:04 IST

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव, लोणी, चाळीसगाव भागांतील सराईत गुन्हेगार, जे संघटितपणे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सक्रिय होते, अशा १६ गुन्हेगारांवर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. या गुन्हेगारांना आता कारागृहाची वाट दाखविली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नाशिक शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये संघटितपणे टोळीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध संबंधित अधीक्षक कार्यालयाकडून मोक्का कारवाईबाबतचे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाने मागविले आहेत. या प्रस्तावांचे अवलोकन करून ‘मोक्का’ची कारवाई लागू करण्यात येत असल्याचे शेखर-पाटील यांनी सांगितले. यानुसार मालेगाव, लोणी, चाळीसगावमधील प्रत्येकी एक अशा तीन टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. यामधील एकूण १६ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. यामुळे निवडणुकीच्या कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नाशिक परिक्षेत्र कार्यालयाकडून वरील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षक कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना देत प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्याचे आदेश दिले आहेत. अशा आहेत मोक्कामधील टोळ्या... 

चाळीसगाव टोळी- टोळीप्रमुख- सुमीत उर्फ सुमेध उर्फ बाबा उर्फ सरकार भोसले, उद्देश उर्फ गुड्डु शिंदे (रा.हिरापुर), सचिन गायकवाड (२३,रा.प्रभातगल्ली), अनिस उर्फ नव्वा शेख (२३,रा.हुडको कॉलनी),शाम उर्फ सॅम नामदेव चव्हाण (रा.हिरापुर), संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ (रा.हिरापुर), भुषण मच्छिंद्रनाथ अहेर (रा.न्यायडोंगरी), सावन मनसुब उग्रेजिया (रा.सिंधी कॉलनी) यापैकी सुमीत, गुड्डु, सॅम, भुषण आणि संता हे फरार असून ते पोलिसांना हवे आहेत. या टोळीवर खून, प्राणघातक हल्ले यांसारखे विविध गंभीर गुन्हे आहेत.लोणीची टोळी - टोळीप्रमुख- अमर बाळु भोसले (२३, रा.प्रवरानगर), अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले (२१), ऋषिकेश उर्फ भैया बाबासाहेब सरोदे (२३), आदित्य बाळासाहेब गायकवाड (२०), मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल अल्हाट(२० सर्व रा.आहेरवस्ती),

-मालेगावची टोळी -टोळीप्रमुख- मोहंमद युसुफ याकूब उर्फ भुऱ्या (३६,रा.पवारवाडी, शरजील अहमद रफिक अहमद (२६,रा.अस्माबाग), अब्दुल मुस्सवीर इरशाद अहमद (२४,रा.मुस्लीमनगर), 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिक