मराठा क्रांती मोर्चासाठी मालेगावी जागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:19 IST2017-08-05T23:48:43+5:302017-08-08T11:19:22+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे शहर व तालुक्यातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

मराठा क्रांती मोर्चासाठी मालेगावी जागृती रॅली
मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी मालेगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेली दुचाकी रॅली.
मालेगाव : मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे शहर व तालुक्यातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
रॅलीला येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयापासून प्रारंभ झाला. रॅली सटाणा नाका, मोसमपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्वर, मोसमपूल, कॅम्परोड, एकात्मता चौक, मोची कॉर्नर, सोमवार बाजार चौक, रावळगाव नाका, चर्च गेट, सोयगावमार्गे काढण्यात आली. रॅलीचा समारोप भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ करण्यात आला. यावेळी अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी निघणाºया मोर्चात मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रॅलीदरम्यान जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा यासह इतर घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत शहरासह सायने, देवारपाडे, शेंदुर्णी, नाळे, साकूर, दाभाडी, सोयगाव आदींसह सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.