मालेगावी हॉटेलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:24 IST2020-07-13T00:24:28+5:302020-07-13T00:24:48+5:30
मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.

मालेगावी हॉटेलला आग
मालेगाव मध्य : शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.
मच्छी बाजार येथील नगरसेवक जाहीद शेख जाकीर यांच्या मालकीच्या मिलन हॉटेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या नळीतुन गॅस गळती झाल्याने आग लागली. वेळीच प्रसंगावधान राखत नगरसेवक मन्सुर अहमद शब्बीर अहमद यांनी मनपाच्या अग्निशामक केंद्रास माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक दलाचे दोन व जामेतुल स्वालेहात उपकेंद्राचे एक असे तीन बंबांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविली. त्यामुळे मोठी जीवीत हानी टळली.