मालेगावी गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:05 IST2018-10-10T22:01:29+5:302018-10-10T22:05:39+5:30

आझादनगर : मालेगाव शहरातील जाकीर हुसेन रस्त्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एक लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

Malegaon gutka seized | मालेगावी गुटखा जप्त

मालेगावी गुटखा जप्त

ठळक मुद्देएक लाख ८४ हजार ६३६ रुपयांच्या मुद्देमालासह शेख अतिक शेख सलीम (२६) यास ताब्यात घेण्यात आले


आझादनगर : मालेगाव शहरातील जाकीर हुसेन रस्त्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एक लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
जप्त केलेला गुटखासाठा कारवाईसाठी अन्नसुरक्षा अधिकारींकडे सुपुर्द करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांना मिळालेल्या गुप्तमाहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. जाकीर हुसेन रस्त्यावरील यादगार कॅन्टिंग येथे छापा टाकण्यात आला. सदर कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाला असा एकूण एक लाख ८४ हजार ६३६ रुपयांच्या मुद्देमालासह शेख अतिक शेख सलीम (२६) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Malegaon gutka seized