मालेगावी गुदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:23 IST2020-04-30T22:30:34+5:302020-04-30T23:23:29+5:30
मालेगाव: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महेश नगर भागात गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुदामास भीषण आग लागून लाखो रु पये किमतीचा माल जळून खाक झाला.

मालेगावी गुदामास आग
मालेगाव: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महेश नगर भागात गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुदामास भीषण आग लागून लाखो रु पये किमतीचा माल जळून खाक झाला. महेश नगर भागात अग्निशमन विभागामागे शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाजी पुतळ्याजवळ रहिवासी भागात आग लागल्याने आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाचे सहा बंब आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. त्यामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज येऊ शकला नाही.