माळेगाव प्रथम
By Admin | Updated: June 1, 2017 00:45 IST2017-06-01T00:45:32+5:302017-06-01T00:45:43+5:30
सिन्नर : ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्णात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला

माळेगाव प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्णात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सरपंच अनिल आव्हाड, माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाक्चौरे यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे उपस्थित होत्या.
माळेगाव ग्रामपंचायतच्या यशाबद्दल गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे, बबन बिन्नर, संजीवनी चौधरी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.