मालेगावी उपमहापौरांचा प्रभाग समस्यांचे आगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 23:19 IST2021-08-22T23:19:54+5:302021-08-22T23:19:54+5:30
सोयगाव : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर नीलेश आहेर यांच्या प्रभागातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त बनले असून, या भागातील प्रश्न सोडवून नागरी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मालेगावी उपमहापौरांचा प्रभाग समस्यांचे आगर
सोयगाव : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर नीलेश आहेर यांच्या प्रभागातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त बनले असून, या भागातील प्रश्न सोडवून नागरी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
प्रभाग क्र. १० मध्ये कृष्ण कॉलनी, जयरामनगर, नववसाहत, दौलती शाळा, कृषिनगर गावठाण, पवननगर एमजी मार्केट, टेहरे चौफुली, स्वप्नपूर्ती नगर हा भाग येतो. या भागात रस्ते, गटारी, पथदीप यांची समस्या आहे. भूमिगत गटारींची चेंबर्स उघडी असून अपघात होत आहेत. गटारींचे कामही अतिशय मंदगतीने सुरू आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी घरात शिरते. तसेच स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांचे हाल होतात. संबंधितांकडे तक्रार करूनही कुणी दखल घेत नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.