शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मालेगावी कोरोनाबाधित चारशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:54 IST

मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला आणखी हादरा बसला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम घालण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब केला जात आहे.मंगळवारपासून शहरात विविध ठिकाणी सर्दी, पडसे आदी आजार असलेल्या नागरिकांची मोफत तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मालेगावी पुण्याच्या सामाजिक संस्थेकडून रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत, तर मालेगाव शहराची माहिती असलेल्या आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या सुनील कडासने यांना पुन्हा अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा मालेगावकरांना चांगला फायदा होणार आहे. परिणामी बाहेर मोकाट फिरणाऱ्या लोकांना ते निश्चितच लगाम घालू शकतील.आपले गाव सोडून मालेगावी बंदोबस्तासाठी आलेल्या एसआरपीएफ जवान बाधित होत असल्याने आणि पोलीसदेखील बाधित होत असल्याने पोलीस दलात चिंंतेचे वातावरण आहे. ३ मे रोजी ३२६ कोरोनाबाधित रुग्ण होते. दुसºया दिवशी ८१ निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आल्याने काहीसे हायसे वाटले होते. मात्र ४ मे रोजी ८ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने रुग्ण संख्या ३३५वर पोहोचली तर काल ५ मे रोजी ४३ पैकी १७ जण पॉझिटिव्ह मिळून आले. रात्री आलेल्या अहवालात ३७ जण पुन्हा पॉझिटिव्ह मिळाले. यामुळे मंगळवारी दिवसभरात ५४ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या ४१६ वर जाऊन पोहोचली.मालेगाव शहरात हेल्पलाइन सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, बहुतेक कॉल्स हे जीवनावश्यक वस्तू, संचारबंदी कालावधीत मिळणाºया सुविधा, कोरोनासंदर्भातील प्राथमिक लक्षणे, कोविड आणि नॉनकोविड रुग्णालयांची माहिती आदी प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण या हेल्पलाइन सेंटरवरून करण्यात आल्याचेही हेल्पलाइन सेंटर येथे कार्यरत मंडळ अधिकारी निकम यांनी सांगितले.शहरामध्ये नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य वमहिला रुग्णालयाचा समावेश आहे. कोविड केअर सेंटर्ससाठी आयएचएसडीपी बिल्डिंग व मन्सुरा हॉस्टेलचा समावेश करण्यात आला आहे. डेडिकेटिड कोविड हॉस्पिटलसाठी जीवन व फरहान हॉस्पिटल यांचा समावेश असल्याचे सहाय्यक चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

---------------------------------

हेल्पलाइन सज्जकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांसाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या हेल्पलाइन सेंटरचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७४८६३२९ असा आहे. नागरिकांना असलेल्या अडचणी व सुविधेविषयी माहिती घेण्यासाठी ही हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली असून, आजपर्यंत जवळपास ८४ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे हेल्पलाइन सेंटर येथे कार्यरत मंडळ अधिकारी निकम यांनी सांगितले. नागरिकांनी मदत घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक