मालेगावी हास्यकल्लोळ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 23:25 IST2022-03-29T23:23:45+5:302022-03-29T23:25:36+5:30

संगमेश्वर : महाराष्ट्रातील नामवंत विनोदी कलावंत प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर) यांच्या हास्यकल्लोळ या विनोदी कार्यक्रमाने स्व. भाऊ गोरवाडकर स्मृती सोहळा साजरा झाला.

Malegaon Comedy Program | मालेगावी हास्यकल्लोळ कार्यक्रम

मालेगावी गोरवाडकर वाड्यात हास्यकल्लोळ कार्यक्रम सादर करताना प्रा. दीपक देशपांडे.

संगमेश्वर : महाराष्ट्रातील नामवंत विनोदी कलावंत प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर) यांच्या हास्यकल्लोळ या विनोदी कार्यक्रमाने स्व. भाऊ गोरवाडकर स्मृती सोहळा साजरा झाला.

नेते, अभिनेते यांच्या हुबेहूब भाषणांच्या नक्कलांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू या ज्येष्ठ अभिनेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील या राजकीय नेत्यांच्या भाषणांच्या नकलांनी चांगलीच दाद दिली.
डॉ. विनोद गोरवाडकर यांनी प्रास्ताविक केले. मामको अध्यक्ष राजेंद्र भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भोसले यांनी प्रा. देशपांडे यांचा सत्कार केला. भोसले यांनी गोविंदराव गोरवाडकर यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जोशी यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. रविराज सोनार यांनी आभार मानले.

 

Web Title: Malegaon Comedy Program