मालेगावी युवा क्रांती यात्रेनिमित्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:57 IST2019-01-07T01:55:23+5:302019-01-07T01:57:35+5:30

मालेगाव : भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष केशवचंदजी यादव यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा काढण्यात आली आहे. याबाबत आमदार आसीफ शेख यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Malegaavi Yuva Kranti Yatra Eminent Meeting | मालेगावी युवा क्रांती यात्रेनिमित्त बैठक

06‘ेमालेगावी हजार खोलीतील कॉँग्रेस संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलताना आमदार आसिफ शेख. समवेत स्वप्निल पाटील, फारुक अहमद सागर, फारुक कुरेशी, इम्तियाज कमाल, साबीर गौहर.

ठळक मुद्देकाश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा

मालेगाव : भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष केशवचंदजी यादव यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा काढण्यात आली आहे. याबाबत आमदार आसीफ शेख यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
काश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा गुरुवारी (दि.१०) मालेगावात दाखल होणार आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत युवक कॉँग्रसचे नाशिक जिल्हा प्रभारी प्रशांत उगले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा युवक कॉँग्रेसचे स्वप्निल पाटील, उपाध्यक्ष कल्याणी रांगोली, आमदार आसीफ शेख, युवक कॉँग्रेस अध्यक्ष फारुक अहमद सागर, फारुक कुरेशी, महासचिव इम्तियाज कमाल, प्रवक्ता साबीर गौहर आदी उपस्थित होते.

Web Title: Malegaavi Yuva Kranti Yatra Eminent Meeting