मालेगावी तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: September 1, 2015 22:43 IST2015-09-01T22:42:13+5:302015-09-01T22:43:44+5:30
मालेगावी तहसीलवर मोर्चा

मालेगावी तहसीलवर मोर्चा
मालेगावी तहसीलवर मोर्चामालेगाव : मालेगाव येथील आयटक संलग्न विविध कामगार संघटना देशव्यापी संपात सहभागी झाल्या असून, विविध संघटनांतर्फे मोर्चा काढून तहसीलदार दीपक पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात घरकामगार, बांधकाम कामगार, शेतमजूर आशा अंशकालीन स्त्री परिचर, ग्रामरोजगार सेवक, मनरेगा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, संगणक परिचालक, वाहनचालक ईपी.एफ. पेन्शनर्स सोसायटी कामगार सहभागी झाले होेते. घरकामगार, मोलकरणी, बांधकाम कामगार मंडळासाठी पूर्णवेळ कर्मचारी कामगार विभागाने नेमावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जि.प. कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदि विविध मागण्यांचा समावेश आहे.
माकप कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मोसमपूलमागे प्रांत कचेरीवर मोर्चा नेण्यात आला. र्मोर्चाचे नेतृत्व कॉ. राजू देसले, प्रा.के.एन. अहिरे, सुनीता कुलकर्णी, संगीता उदमले यांंनी केले. मोर्चात मो. मुस्तफा, फैजान अन्सारी, मकसूद अहेमद, इसरार आजमी, शखीक आजमी, मो. सलीम हमीद मुकादम, वाहीद मुकादम, जलील अहेमद, मो. इस्माईल, छोटे अंडेवाले, गणेश घुगे, काशीनाथ गायकवााड, शशिकांत आहेर, प्रकाश नाईक, दावल पाटील, सखाराम पाटील यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)