साकोरा रस्त्यावर मका ट्रॉली उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:41 IST2018-12-04T00:38:22+5:302018-12-04T00:41:18+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावर सोमवारी दुपारी मक्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला असून, नांदगाव पोलिसांत बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

The Makka trolley on the road of Sakura road has come down | साकोरा रस्त्यावर मका ट्रॉली उलटली

साकोरा - नांदगाव रस्त्यावर मक्याने भरलेली पलटलेली ट्रॅक्टर ट्रॉली.

ठळक मुद्देसुदैवाने ट्रॅक्टरचे चालकाचा जीव वाचला.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावर सोमवारी दुपारी मक्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला असून, नांदगाव पोलिसांत बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मंगळणे येथून मक्याने भरलेलला ट्रॅक्टर घेऊन विशाल पाटील नांदगावकडे येत असताना म्हसोबा मंदिराजवळ मागच्या बाजूने बसचालकाने हुलकावणी दिल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने ट्रॅक्टरचे चालकाचा जीव वाचला.
याबाबत नांदगाव पोलिसांनी पंचनामा करून बसचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक भवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक घायवटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The Makka trolley on the road of Sakura road has come down

टॅग्स :Accidentअपघात