मखमलाबादला गुन्हेगारांच्या टोळक्याचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST2021-02-12T04:15:10+5:302021-02-12T04:15:10+5:30

मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथील गीतगंगा सोसायटी परिसरात शनिवारी (दि.६) रात्री संशयित अजय घोडके, वैभव भडांगे, कमलेश सुराणा, प्रविण ...

Makhmalabad is a hotbed of criminal gangs | मखमलाबादला गुन्हेगारांच्या टोळक्याचा धिंगाणा

मखमलाबादला गुन्हेगारांच्या टोळक्याचा धिंगाणा

मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथील गीतगंगा सोसायटी परिसरात शनिवारी (दि.६) रात्री संशयित अजय घोडके, वैभव भडांगे, कमलेश सुराणा, प्रविण जाधव व किरण (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांनी धिंगाणा घालत दहशत माजविली. पाण्याच्या टाकीजवळून निघालेल्या या टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमवित मखमलाबाद,आळंदी पाटरस्ता ते रोडवर असलेल्या खंडेराव मंदिरापर्यंत हातात लाठ्या काठ्या घेऊन दहशत माजविली. वाटेत दिसणाऱ्या रहिवाशांना विनाकारण शिवीगाळ व दमबाजी करुन महापालिकेचे पथदीप फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने रहिवाशांच्या घरांच्या दिशेने दगडफेक करीत रिकाम्या भूखंडावरील गवतालाही आग लावली. याप्रकरणी पोपट किसन येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसरुळ पोलिसांनी टोळक्याविरुधद गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमधील अजय घोडकेे, कमलेश सुराणा, यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Makhmalabad is a hotbed of criminal gangs