चिकाटीने आयुष्य घडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:13 PM2020-02-02T23:13:41+5:302020-02-03T00:22:54+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम केले, प्रयत्न केले तर नक्की यशस्वी होतील. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी केले.

Make a Sustainable Life! | चिकाटीने आयुष्य घडवा !

ठाणगाव येथे भोर विद्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या सत्कारप्रसंगी व्ही.एस. कवडे, बी.बी. पगारे, ए.बी. कचरे, पी.बी. थोरात, एस.एस. सोनवणे, एस.डी. सरवार, आर.डी. काकड, आर.डी. सांगळे, जी.एस. पावडे आदी.

Next
ठळक मुद्देहर्षवर्धन सदगीर : ठाणगावच्या भोर विद्यालयात गौरव

ठाणगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम केले, प्रयत्न केले तर नक्की यशस्वी होतील. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विद्यालयाच्या झांजपथक व लेजीम पथकाच्या तालात सदगीर यांची मिरवणूक काढण्यात आली.
प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, शालेय समिती सदस्य शरद काकड, डी. एम. आव्हाड, अरुण केदार, ज्ञानेश्वर शिरसाठ, भाऊसाहेब शिंदे, नवनाथ दौंड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी अंक देऊन सदगीर यांचा सत्कार करण्यात आला. ए. बी. कचरे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक बी. बी. पगारे यांनी आभार मानले. यावेळी एस. एस. शेणकर, आर. सी. काकड, आर. एल. मधे, बी. एस. भांगरे. एस. डी. सरवार, आर. डी. सांगळे, आर. एम. मणियार, बी. जी. बिन्नर, ए. एन. जगताप, डी. बी. दरेकर, वाय. एम. रु पवते, आर. जी. मेंगाळ, जी. एस. पावडे, एम. एम. खांबाईत आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Make a Sustainable Life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.