ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST2021-07-03T04:10:21+5:302021-07-03T04:10:21+5:30
--------------------- राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सिन्नरच्या शेतकऱ्यांचे यश सिन्नर : रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सिन्नरच्या शेतकऱ्यांनी यश ...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या
---------------------
राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सिन्नरच्या शेतकऱ्यांचे यश
सिन्नर : रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सिन्नरच्या शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील डुबेरे व महाजनपूर येथील शेतकऱ्यांनी राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. डुबेरे येथील सुहास बर्वे व महाजनपूरचे आप्पासाहेब आरोटे यांनी गव्हाचे भरघोस उत्पादन घेत स्पर्धेत यश मिळविले.
-------------------------
पेट्रोल-गॅस दरवाढीने सर्वसामान्य हैराण
सिन्नर : गेल्या काही दिवसांत पेट्रोल व गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे उत्पादनात घट आली असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. गत महिन्यात पेट्रोलने शंभरी पार केली. महिन्याभरात पेट्रोलचे दर आता १०५ रुपयांवर गेले आहेत, तर स्वयंपाकाचा गॅसही सुमारे २५ रुपयांनी महाग झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत चालले आहे.