नाशिक औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’
By Admin | Updated: March 30, 2017 00:21 IST2017-03-30T00:20:09+5:302017-03-30T00:21:17+5:30
सातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’
सातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० ते ३१ मे या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी दिली. गेल्या १५ ते २० वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने येथील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बॅनर्जी यांनी सांगितले, विदर्भ, मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. म्हणून नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावे, विमानतळाचा प्रश्न मार्गी लागावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून ४०० हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही. अशा अनेक समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला मेक इन नाशिक हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चन्ट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्र माला शासकीय स्तरावर सहकार्य लाभणार आहे, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.
या उपक्र मासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे मेक इन नाशिक उपक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नाशिकचे ब्रँडिंग करून नाशिकला मोठी गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणीस उदय खरोटे, आशिष नहार, ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर, मनीष रावळ, संदीप भदाणे, मोहन सुतार आदिंनी दिली आहे. (वार्ताहर)