दंगलीची न्यायालयीन चौकशी करा

By Admin | Updated: July 18, 2015 00:20 IST2015-07-18T00:18:30+5:302015-07-18T00:20:36+5:30

विखे पाटील यांची मागणी : दिवसभर तणावपूर्ण शांतता

Make a judicial inquiry into riots | दंगलीची न्यायालयीन चौकशी करा

दंगलीची न्यायालयीन चौकशी करा

नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा येथे झालेल्या दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
दंगलग्रस्त हरसूल आणि ठाणापाडा भागात भेट देऊन दंगलग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आले असता ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात होरपळणाऱ्या हरसूल आणि ठाणापाडा परिसरात आज तणावपूर्ण शांतता होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन चौकशी केली आणि व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आवाहन केल्यानंतर परिसरातील दुकाने हळूहळू उघडली. दंगलग्रस्तांशी झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणी अधिवेशनात मुद्दा उचलणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार निर्मला गावित, जिवा पांडू गावित, मालेगावचे आसिफ शेख यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान ईदसाठी येथे बाजार भरणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त कायम असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.
विखे पाटील यांच्या
दौऱ्यात कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, नाशिकचे
नगरसेवक गुलजार कोकणी
आदिही सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Make a judicial inquiry into riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.