शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

केवळ १४०० शेतकऱ्यांच्याच मक्याला मिळाला हमीभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:49 IST

नाशिक : जिल्ह्यात यावर्षी मक्याचे पीक चांगले आले असतानाही मार्केटिंग फेडरेशनने दीड महिन्यात जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवर केवळ १४६७ शेतकऱ्यांची ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी केली असून, त्यापैकी फक्त ५२९ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत पेमेंट अदा करण्यात आले आहेत. केंद्राच्या लालफितीच्या कारभारामुळे हजारो शेतकरी अद्याप मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देहजारो शेतकरी प्रतीक्षेत : सरकारी यंत्रणेचा लालाफितीचा कारभार

केंद्र शासनाने मक्याला १८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी खुल्या बाजारात एकाही व्यापाऱ्याकडून हमीभावाने मका खरेदी केली जात नाही. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभावाने मका खरेदी करण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण ९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रे सुरू झाल्यानंतर २ नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकूण ९०९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी फक्त ३९८१ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माल आणण्याचे एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १४६७ शेतकऱ्यांचा ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मालापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांना पेमेंट अदा करण्यात आले आहे.सरकारी काम, सहा महिने थांबखरेदी केंद्रांचा कारभार पहाता ह्यसरकारी काम आणि सहा महिने थांबह्णचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. केंद्रांवर शेतकऱ्यांना प्रथम ऑनलाइन नोंदणी करून केंद्राकडून येणाऱ्या एसएमएसची वाट पहावी लागते. एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांना आपला माल केंद्रावर घेऊन जावा लागतो. त्यानंतर पेमेंट खात्यावर वर्ग होण्याची वाट पहावी लागते. याउलट खुल्या बाजारात थेट वक्री होऊन लगेचच पैसे मिळत असल्याने खुल्या बाजाराला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.फक्त २ शेतकऱ्यांना मिळाली ज्वारीची रक्कमज्वारीला २६२० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात असला तरी जिल्ह्यातील केवळ ८९ ज्वारी उत्पादकांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले, पैकी फक्त ४२ शेतकऱ्यांची ९८३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत देवळा तालुक्यातील २ शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीची रक्कम अदा करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती