खरिपातील मका गुदमरतोय पोळीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:56 IST2020-06-08T22:13:26+5:302020-06-08T23:56:49+5:30
खरीप हंगामाच्या शेतकामांना वेग आला असला तरी मागील वर्षी मोठ्या मेहनतीने पिकवलेला खरीप हंगामातील मका मात्र दरवाढीच्या आशेने आजही पोळीमध्येच गुदमरत आहे.

खरिपातील मका गुदमरतोय पोळीतच!
जळगाव नेऊर : परिसरात खरीप हंगामाच्या शेतकामांना वेग आला असला तरी मागील वर्षी मोठ्या मेहनतीने पिकवलेला खरीप हंगामातील मका मात्र दरवाढीच्या आशेने आजही पोळीमध्येच गुदमरत आहे.
अतिवृष्टी, लष्करी अळी या संकटातून वाचवलेला मका शेतकऱ्यांनी पोळी मारून ठेवला आहे. कांदा लागवड, काढणी आदी कामे आटोपून अनेक शेतकरी मार्च, एप्रिल महिन्यात मका काढतात.
मात्र यावर्षी कोरोनाचा फटका बसला व बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी मका तसाच ठेवला आहे. शासनाने एकरी बारा क्विंटल मका एक हजार ७६० या दराने नाफेडमार्फत खरेदी सुरू केली आहे; मात्र ती रब्बी हंगामातील मक्यासाठी आहे. त्यामुळे खरीप मका उत्पादक शेतकºयांच्या पदरी निराशा पडली आहे. सात ते आठ महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या मक्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट येत आहे. शासनाने खरीप, रब्बी असा भेदभाव न करता सरसकट
मका खरेदी करावी, अशी
मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन व संचारबंदीने वाहतूक बंदी झाली. परिणामी शेतकºयांना मका काढता आला नाही. मका काढून जास्त दिवस ठेवल्यास कणसांना कीड लागते. तसेच कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्याने त्याचा फटका मका उत्पादकांना बसला आहे. परिणामी अडचणीत आलेल्या शेतकºयांना मिळेल त्या दरात मका विक्र ी करावा लागत आहे.
मागील वर्षी तीन एकरावर मका पिकाची लागवड केली होती. अतिवृष्टी, लष्करी अळी यातून कसेबसे पीक वाचवून दर वाढतील या आशेने मका पोळ मारून ठेवला. सुरु वातीला दोन हजारावर गेलेला मका आज मात्र आठ महिने थांबूनही बाराशे रु पयांच्या आसपास विकावा लागत आहे. यातून खर्चदेखील वसूल होत नाही. शासनाने खरीप-रब्बी असा भेदभाव न करता सरसकट मका खरेदी करावा.
- ज्ञानेश्वर दराडे,
मका उत्पादक