नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने मका पीक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:23 IST2020-07-25T21:02:49+5:302020-07-26T00:23:14+5:30
नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने मका पीक भुईसपाट
नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शहरात चोवीस तासांत १९४ मिली पावसाची नोंद झाली. तालुक्याच्या काही भागात वादळी वाºयासह पावसाने झोडपल्याने फुलोरा येण्याच्या स्थितीतल्या मका व बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले. मूग, भुईमूग या पिकांना नत्र खताची गरज नाही. ते इतर खतांमधूनदेखील मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फक्त युरियाची मागणी करू नये. पिकाच्या सकस वाढीसाठी स्फुरद व पालाश या खनिजांची व झिंक, मग्नेशियम अशा मायक्रो घटकांची गरज असते. तालुक्यात ८० सीएससी सेंटर व ग्रामपंचायतीतील आपले सेवा केंद्र यांच्यामार्फत आतापर्यंत १५ हजार खातेदारांनी पीकविमा उतरविला असून, राहिलेल्या शेतकºयांनीदेखील २७ जुलैपर्यंत पीकविमा उतरवून घ्यावा. विम्यासाठी ३१ जुलैअखेरची तारीख आहे. शेतकºयांनी गर्दी करू नये अंतिम तारखेची वाट न पाहता पीकविमा उतरून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.
-------------------
वणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी
गेल्या महिनाभरापासून किरकोळ हजेरीवगळता दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. अपवाद-वगळता पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीच्या पावसावर टमाटा लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. सोयाबीन, बाजरी, मका व इतर पिकांसाठी पेरणी केली होती. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. भात लावणी व संबंधित भातशेतीच्या कामांना अग्रक्र म देण्यात आला होता. सध्या मजुरांअभावी ही सर्व कामे घरातील कुटुंबीयांचे सदस्य आपल्या परीने करत होते. या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पर्जन्यराजा रु सून बसला. शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पर्जन्यराजाला साकडे घालत होता.