बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयितास अटक

By Admin | Updated: July 5, 2017 00:55 IST2017-07-05T00:55:39+5:302017-07-05T00:55:57+5:30

नाशिक : बनावट नोटा प्रकरणातील अण्णा कुमावत यास गुन्हे शाखेने अटक केली़

The main suspects arrested in the fake currency case were arrested | बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयितास अटक

बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयितास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शंभर रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयित अण्णा कुमावत (रा. खर्डी, ता़ शहापूर, जि. ठाणे) यास गुन्हे शाखेने सोमवारी (दि़३) रात्री जेलरोड परिसरातून अटक केली़ कुमावत हा आपल्या नातेवाइकांकडे लपून बसला होता़ त्यास न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि़६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून शनिवारी (दि़१) रात्री पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून एका इंडिका कारमधील चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते़ ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील या चौघांकडे शंभर रुपयांच्या १ हजार ७०२ बनावट नोटा अर्थात १ लाख ७० हजार २०० रुपये जप्त केले होते़ या बनावट नोटांमधील प्रमुख संशयित अण्णा कुमावत यास कुणकुण लागल्याने तो वाडीवऱ्हे परिसरात कारमधून उतरून फरार झाला़ कुमावतच्या शोधासाठी पोलीस खर्डी येथे त्याच्या घरीही जाऊन आले होते, मात्र तो घरी आढळून आला नाही़ कुमावत हा जेलरोड परिसरातील नातेवाइकांकडे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, शिपाई संदीप भुरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून अटक केली़

Web Title: The main suspects arrested in the fake currency case were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.