शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:09 IST

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली. 

ठळक मुद्देमराठा समाजाच्या पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोधसमाजाला आरक्षण मिळविण्यासाठी एकजूट टिकविण्याचे आवाहन

नाशिक : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आरक्षण प्राप्त करणे आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पक्ष स्थापनेशी संबंध नसून नाशिकसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचाही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे सांगतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्षाची निर्मिती करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले. गेल्या आठवड्यात नवीन मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष अथवा संघटनांची स्थापना करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, अशा प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची हीच भूमिका असून, नशिकमधूनही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे नाशिकच्या समन्वयकांनी सांगितले. यावेळी पुंडलिक बोडके, सचिन पवार, अमित नडगे, विशाल कदम आदी उपस्थित होते. 

कोणीही नेता नाही मराठा क्रांती मोर्चात कोणीही नेता, मार्गदर्शक, पाठीराखा अथवा रसद पुरविणारा व्यक्ती नाही, हे मोर्चाचे ठळक वैशिष्ट्य आहे.‘ एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन मराठा समाज आपसातील मतभेद, पक्ष, संघटना विसरून एकवटला होता. ही एकजूट अशीच पुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाजाचा कोणताही विशिष्ट पक्ष, संघटना अथवा नेता असणार नसल्याचेही नाशिकच्या समन्वयकांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकPoliticsराजकारणreservationआरक्षणmarathaमराठा