महिला,बाल विकास भवन कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:20 PM2020-08-20T21:20:00+5:302020-08-21T00:38:54+5:30

महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यालयाचे एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

Mahila, Bal Vikas Bhavan implemented | महिला,बाल विकास भवन कार्यान्वित

महिला, बाल कल्याण कक्षाचा शुभारंभ करताना बाळासाहेब क्षीरसागर, लीना बनसोड, रवींद्र शिंदे, अश्विनी आहेर आदी.

Next

नाशिक : महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यालयाचे एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
राज्यात महिला व बाल कल्याण विकासासाठी राबविण्यात येणाºया राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण विभागाचे सचिवांनी प्रत्येक जिल्'ात ‘महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हास्तरावरील महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते व महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अति मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, इशाधिंन शेलकांदे, डॉ कपिल आहेर हे उपस्थित होते.

Web Title: Mahila, Bal Vikas Bhavan implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.