ओझर माहेश्वरी महिला मंडळातर्फे चिमुकल्यांना मायेची उब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:49 IST2019-12-28T16:48:45+5:302019-12-28T16:49:05+5:30
ओझर : येथील जिल्हा परिषदेच्या सोनेवाडी आणि बाणगंगानगर शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या ऐंशी गरजू विद्यार्थ्यांना ओझर माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे स्वेटरांचे वाटप करण्यात आले.

ओझर माहेश्वरी महिला मंडळातर्फे चिमुकल्यांना मायेची उब
ओझर : येथील जिल्हा परिषदेच्या सोनेवाडी आणि बाणगंगानगर शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या ऐंशी गरजू विद्यार्थ्यांना ओझर माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे स्वेटरांचे वाटप करण्यात आले. सोनेवाडी जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माहेश्वरी महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष नीता डागा उपस्थित होत्या. यावेळी बाणगंगा नगर शाळेच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंकार शिबिरातील पूनम सोनवणे,सृष्टी माळी, सविता ढिकले यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपस्थितांचे प्रबोधन केले. स्वाती लद्धा यांनी स्वागतपर भाषणात मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्र म राबवित असल्याचे सांगितले.सचिव नयना हेडा यांनी आपल्या भाषणात विद्यार्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.वारकरी संप्रदायाचे पांडुरंग आहेर यांनी फॉरजीच्या युगात अध्यात्माकडे दुर्लक्ष करू नका तेच आत्मिक समाधान देत असते असे सांगितले.अध्यक्ष नीता डागा यांनी मंडळ नेहेमी मदतीसाठी तत्पर असते असे आश्वासन दिले तसेच मंडळ नेहेमी लोकाभिमुख उपक्र म हाती घेत असल्याचे सांगितले.यावेळी अनिता सारडा,ओझरच्या अध्यक्षा जयकांता लद्धा,सरिता जाजू,हर्षा ब्यास,आरती चांडक,कल्पना लद्धा,सुलोचना जाजू,कमला शर्मा,पूनम जाजू,योगिता जाजू,श्वेता लद्धा, गीता जाजू,प्रवीण लद्धा,संजय सारडा,विनोद चांडक,योगेश जाजू,संजय ब्यास,भूषण जाजू,रोहित सारडा, राजेश जाजू, डॉ.ज्ञानेश्वर बोराडे, नलिनी अहिरे, डॉ.सोमनाथ घोटेकर,विलास मुरकुटे,रामदास पवार,शीतल येवले,हेमलता पगार,दिनकर रसाळ,भास्कर हळदे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांनी मांडले.