पिंपळनारे सरपंचपदी महेश कोठुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:45 IST2021-03-02T22:56:09+5:302021-03-03T00:45:37+5:30
वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील पिंपळनारेच्या सरपंचपदी महेश कोठुळे, तर उपसरपंचपदी दामू पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपळनारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेश कोठुळे, तर उपसरपंचपदी दामू पवार यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी जल्लोष करण्यात आला.
वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील पिंपळनारेच्या सरपंचपदी महेश कोठुळे, तर उपसरपंचपदी दामू पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली होती. सरपंच पदासाठी महेश कोठुळे यांनी, तर उपसरपंचपदासाठी दामू पवार यांनी अर्ज दाखल केला होता. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजय भंडारी यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सदस्य सविता पाटील, शालिनी गागुर्डे, पवार गंगुबाई, मीना गायकवाड, सुजाता गांगुर्डे, नीलेश आहेर, उल्हास गांगुर्डे यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी पोलीसपाटील नवनाथ पाटील, चेअरमन महेद्रसिंग परदेशी, माजी सरपंच अनिल कोठुळे, एकनाथ आहेर, विष्णू आहेर, भाऊराव आंबेकर, पुंडलिक गागुर्डे उपस्थित होते.