महायुती म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:11 AM2019-10-17T01:11:03+5:302019-10-17T01:11:35+5:30

आम्ही महायुतीत असलो तरी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे जागावाटपात काहीसा अन्याय झाला असला तरी आम्हाला कॉँग्रेस-राष्टÑवादीला सत्तेवर येऊ द्यायचे नसल्यानेच आम्ही महायुतीत कायम आहोत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आल्यावर दगडापेक्षा वीट मऊ हा विचार करूनच महायुतीशी घरोबा कायम ठेवला असल्याचे राष्टÑीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Mahayuti means brick softer than stone: Mahadev Jankar | महायुती म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ : महादेव जानकर

महायुती म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ : महादेव जानकर

Next
ठळक मुद्देभाजपबरोबरच राहणार असल्याचे स्पष्टीकरण

नाशिक : आम्ही महायुतीत असलो तरी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे जागावाटपात काहीसा अन्याय झाला असला तरी आम्हाला कॉँग्रेस-राष्टÑवादीला सत्तेवर येऊ द्यायचे नसल्यानेच आम्ही महायुतीत कायम आहोत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आल्यावर दगडापेक्षा वीट मऊ हा विचार करूनच महायुतीशी घरोबा कायम ठेवला असल्याचे राष्टÑीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री जानकर यांनी निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने कमरेखालची भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगितले. रस्ते, वीज, पाणी, दुष्काळ आणि विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असेदेखील जानकर यांनी नमूद केले. जागावाटपावेळी झालेले वाद हे घरातील भांडण आहे. आता महायुतीत मिळालेल्या एकमेव जागेवर मी समाधानी असल्याचे जानकर यांनी नमूद केले.
भाजपच्या महालात आमची झोपडी
आमच्याच काही कार्यकर्त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतल्याने भाजपला संपूर्ण दोष देऊ शकत नाही. मात्र, भाजपच्या महालात आमच्या पक्षाची किमान एक झोपडी राहू द्या, असे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास असून, ते रासपची झोपडी कायम ठेवतील, असेही जानकर यांनी नमूद केले.

Web Title: Mahayuti means brick softer than stone: Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.