धोंडमाळ येथे महाआवास अभियान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:48 IST2021-02-12T22:00:18+5:302021-02-13T00:48:36+5:30
पेठ -महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अतंर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडमाळ गटातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

धोंडमाळ येथे महाआवास अभियान कार्यशाळा
पेठ -महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अतंर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडमाळ गटातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी बापू सादवे यांनी केले. गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी मार्गदर्शन केले. सभापती विलास अलबाड यांनी अपूर्ण घरे मुदतीत पूर्ण करण्यात यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी तुळशीराम वाघमारे, सुरेश पवार महेश टोपले, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे,भागवत वाघमारे,रघुनाथ प्रधान,विठू गायकवाड ,दिलीप शेवरे,मनोहर शिंदे,भागवत सहाळे, गंगाराम भोये, भागवत गांगोडे, पांडू वाघ उपस्थित होते. ग्रामसेवक भूषण लोहार यांनी सूत्रसंचालन केले.