मार्कंड पिंप्रीच्या शिवमंदिरात महाशिवरात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:46 IST2021-03-11T21:54:58+5:302021-03-12T00:46:59+5:30
वणी ; मार्कंड प्रिंपी येथील ओम नमः शिवाय मंदिरातील शिवभक्तांनी कोविड नियमांचे पालन करत महाशिवरात्र साजरी केली.

सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या मार्कंड पिंप्री येथील शिवमंदिरातील सजावट.
ठळक मुद्देसप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरावर विद्युत रोशणाई
वणी ; मार्कंड प्रिंपी येथील ओम नमः शिवाय मंदिरातील शिवभक्तांनी कोविड नियमांचे पालन करत महाशिवरात्र साजरी केली.
मंदिरातील गाभाऱ्याचे सुशोभिकरण करण्यात आले होते. शिवलिंगाची विशेष सजावट करण्यात आली होती.
ओम् नमः शिवाय, हर हर महादेव, बंब बंब भोले, जय भोलेच्या गजरात पूजाविधी संपन्न झाला. नांदुरीपासुन पुढे ५ किलोमीटर अंतरावर हे पुरातन जागृत शिवमंदिर आहे. या मंदिरात सोमवारी भाविकांची चांगलीच हजेरी असते, मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम जाणवत होता.