महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण: रामदास खेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:01 AM2019-11-10T00:01:04+5:302019-11-10T00:03:27+5:30

नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती जाणून घेतली. महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण असल्याचे यातून दिसून आले, असे मत पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी व्यक्त केले.

Maharashtra's culture attracts tourists from all over the world: Ramdas Khedkar | महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण: रामदास खेडकर

महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण: रामदास खेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देऐतिहासिक वारसाही महत्वाचावाईन टुरिझम विषयी पर्यटकांमध्ये उत्साह

नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती जाणून घेतली. महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण असल्याचे यातून दिसून आले, असे मत पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनात नेमका कसा अनुभव आला याविषयी पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न: इंग्लंडमध्ये महाराष्टÑाच्या पर्यटनाविषयी जाणून घेणाऱ्या पर्यटकांकडून कसा प्रतिसाद लाभला?

खेडकर: इंग्लंडमध्ये तीन दिवस ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ हे प्रदर्शन होते. देशभरातील १७६ देशांनी आपपल्या पर्यटनक्षेत्राविषयीची माहिती देण्यासाठीचे स्टॉल्स उभारले होते. भारतातून महाराष्टÑासह गुजरात, राजस्थान, मध्येप्रदेश कर्नाटक, केरळ, गोवा आणि ओडीसा या राज्यांनी आपापल्या राज्यांमधील पर्यटनाचे प्रमोशन केले. या प्रदर्शनात महाराष्टÑाविषयी जाणून घेणारे पर्यटक आणि पर्यटन करणाºया संस्थांचा समावेश होता. तीनही दिवस परदेशी पर्यटकांनी महाराष्टÑातील वाईल्डलाईफ, वाईट टुरिझम आणि मुंबई विषयीची माहिती जाणून घेतली.


प्रश्न:नाशिकच्या दृष्टीने जमेची बाजू काय राहीली?
खेडकर:  नाशिकची वाईन सातासमुद्रापार गेली आहेच प्रदर्शनात वाईन टुरिझम विषयी पर्यटकांमध्ये कसा उत्साह होता. नाशिकच्या वाईन संदर्भात अनेक पर्यटक आणि पर्यंटन संस्थांनी आवर्जून माहिती घेतली.शिवाय वाईल्ड लाईफ आणि धार्मिकस्थळांची देखील माहिती पर्यटकांनी जाणून घेतली.
महाराष्टÑाची आर्धिक राजधानी असेल्या मुंबई विषयी जाणून घेण्याचा उत्साह परदेशी पर्यटकांमध्ये दिसून आला. अगदी बॉलिवूड पासून ते मुंबईतील ब्रिटीशकालीन वास्तूंची देखील माहिती पर्यटकांनी जाणून घेतली. व्याघ्र प्रकल्प असलेल्या जंगलांची माहिती जाणून घेतांनाच यंदा महाराष्टÑात वाघांची संख्या वाढल्याचे कुतूहल त्यांच्यात दिसले.

मुलाखत- संदीप भालेराव

Web Title: Maharashtra's culture attracts tourists from all over the world: Ramdas Khedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.